Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी- हलकर्णी रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
तेरणी- हलकर्णी रस्त्यावर मोठे झाड  पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

बुधवारी संध्याकाळी सव्वाचारच्या सुमारास तेरणी -हलकर्णी मार्गावरील देसाई सरकार यांच्या शेतापासून थोड्या अंतरावर मोठे झाड अचानक रस्त्यावर  पडल्याने वाहतूक ठप्प झाली. यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याबाबत सरपंच मोसिम मुल्ला यांनी तातडीने माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाला याची माहिती दिली आहे. झाड मोठे व काटेरी असल्याने तातडीने रस्त्या कडेला हटविणे शक्य होत नव्हते. झाड हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे.


आज बुधवार हलकर्णीचा आठवडा बाजार असल्याने या मार्गावर नेहमीपेक्षा जास्त वर्दळ होती. हे झाड साधारण सव्वा चारच्या आसपास रस्त्यावर कोसळले. त्यादरम्यान या मार्गावर कोणतीच वाहने ये जा करत नव्हती. त्यामुळे मोठी जीवित हानी टाळली. या झाडाचा आकार पाहता वाहनधारकांच्या मनात धडकी भरली होती.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.