Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सेवानिवृत्ती निमित्त केंद्रप्रमुख मल्लाप्पा इंगवले यांचा उद्या तेरणीत शुभेच्छा समारंभ


गडहिंग्लज (प्रतिनिधी): मराठी विद्या मंदिर तेरणीचे माजी मुख्याध्यापक, हलकर्णी केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख व तेरणी गावचे सुपुत्र मल्लाप्पा सखाराम इंगवले हे आपल्या ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. या निमित्त उद्या शुक्रवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता मराठी विद्या मंदिर तेरणी येथे शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुणराव देसाई राहणार आहेत. कार्यक्रमास माजी जि. प. सदस्या श्रीमती रेखाताई हत्तरकी, माजी सदस्य जयकुमार मुन्नोळी, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.रुपाली कांबळे, पंचायत समितीचे माजी सदस्य व जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, सामाजिक कार्यकर्ते गंगाधर व्हसकोटी, तेरणीचे सरपंच प्रा. मोसीम मुल्ला,उपसरपंच श्रीमती अक्काताई हजेरी, गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ, विस्तार अधिकारी आर.आर.कोरवी, हलकर्णी केंद्रशाळेचे केंद्र संचालक विजय कोळी, केंद्र सचिव आनंद पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती श्रीमती अनुसया सुतार, संगमेश्वर सेवा संस्थेचे चेअरमन अण्णासो देसाई, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू इंगवले यांच्यासह विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.