Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात जयंतीनिमित्त संस्थापक व्ही.टी पाटील यांना अभिवादन

गडहिंग्लज: शिवराज महाविद्यालयात शिक्षणशार्दुल व्ही.टी.पाटील यांना अभिवादन करताना प्रा. किसनराव कुराडे, डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, प्रा. सौ. बिनादेवी कुराडे व इतर.

गडहिंग्लज ( प्रतिनिधी):
शिवराज महाविद्यालयात ताराराणी विद्यापीठाचे व शिवराज विद्या संकुलाचे संस्थापक शिक्षणशार्दुल व्ही. टी.पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. 

स्वागत व प्रास्ताविक पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सुधीर मुंज यांनी केले. शिक्षणशार्दुल व्ही.टी.पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना प्रा. कुराडे म्हणाले, शिक्षणशार्दुल व्ही.टी.पाटील यांनी शिवराज विद्या संकुलाच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे. शिवराजच्या माध्यमातून या भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श आजच्या विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. त्यांनी ताराराणी विद्यापीठ, मौनी विद्यापीठ व शिवराज विद्या संकुलाच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा कणा मजबूत केला आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत या जिल्ह्यासाठी मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचा वारसा जपण्याचे कार्य आम्ही करीत आहोत. त्यांचे चरित्र नव्या पिढीला कळले पाहिजे यासाठी आमच्या शिवराज विद्या संकुलात नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 'शिक्षणशार्दुल खासदार व्ही.टी पाटील' हे पुस्तक विद्यार्थ्यांना मोफत भेट देण्यात येणार असल्याचे सांगितले.

 यावेळी प्राचार्य डॉ.एस.एम कदम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे, सौ बिनादेवी कुराडे, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार डॉ. आनंद कुंभार यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.