गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त दिनांक ८ ते १४ ऑगस्ट या कालावधीत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील विविध पैलूंवर उहापोह होणार आहे.
या व्याख्यानमालेत भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील राष्ट्रीय काँग्रेसचे योगदान या विषयावर (ॲड. दिग्विजय कुराडे), भारतीय स्वातंत्र्य आणि साम्यवाद (डॉ. राजेंद्र गुंडे), भारतीय स्वातंत्र्य चळवळ (प्रा.सुधीर मुंज), भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये साहित्यिकांचे योगदान (डॉ. मनमोहन राजे), भारतीय स्वातंत्र्य आणि आझाद हिंद सेना (प्रा.गौरव पाटील), भारतीय स्वातंत्र्य आणि प्रति सरकार (पत्री सरकार) (कॉ.दशरथ दळवी), भारतीय स्वातंत्र्य (प्रा. किसनराव कुराडे) यांचे व्याख्यान होणार आहे.
सदर व्याख्याने सकाळी ९ ते १० या वेळेत होणार आहेत. अशी माहिती प्राचार्य डॉ. एस.एम. कदम यांनी दिली. या व्याख्यानाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी केले आहे.

