Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिन विविध उपक्रमांनी साजरा


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
येथील शिवराज महाविद्यालयात मायक्रोबायॉलॉजी विभाग यांच्यावतीने आयोजित आझादी का अमृतमहोत्सव वर्षानिमित्त जागतिक युवा दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव डॉ.अनिल कुराडे, प्रा.सौ.बिनादेवी कुराडे होते.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा. श्रुती पाटील यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. पी. पाटील यांनी आजच्या युवा वर्गामध्ये एच.आय.व्ही या आजाराबद्दल जनजागृती होणे किती महत्वाचे आहे. त्याचबरोबर हे आजार कोणत्या मार्गाने होऊ शकतो. हे आजार झाल्यानंतर त्यावर कोणते औषध उपचार करता येतात व आयुष्य चांगल्यापद्धतीने जगता येते याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. 

पद्मजा गावडे यांनी सध्यस्थितीतील समाजातील काही जीवंत उदाहरण देऊन या आजारांचे गांभीर्य काय आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. एच.आय.व्ही आजारावर समुपदेशन केंद्र कशा पद्धतीने कार्यरत आहेत याबाबत माहिती दिली. यावेळी या आजारांबाबत जनजागृतीची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमात रक्‍त तपासणी शिबीरात हिमाग्लोबीन, रक्‍तगट व एच.आय.व्ही.ची मोफत तपासणी करण्यात आली.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.