![]() |
| गडहिंग्लज: बक्षीस वितरण करताना प्रा.किसनराव कुराडे. यावेळी उपस्थित प्राचार्य डॉ. एस.एम.कदम, प्रा. सौ.बिनादेवी कुराडे यांच्यासह इतर मान्यवर. (छाया: मज्जिद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी ) : देशभक्तीपर गीतांचा नजराणा समूहगीतांमधून सुरेल आवाजात मंत्रमुग्ध करीत होता.... देशाभिमान व्यक्त करणारी ही देशभक्तीपर गीते सामुहिकतेने गाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या गायनातून दिसणारा उत्साह आणि उमेद फुलत होते.... देशाच्या शौर्याचा इतिहास बुलंद करणारी देशभक्ती गीते देशाचा अभिमान प्रत्येकांच्यामध्ये जागवित होता.... देशप्रेमाची भावना व्यक्त करणारी समूहगीते सुरेल आवाजाच्या साथीने संगीताच्या तालावर रसिकांना मंत्रमुग्ध करीत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाची प्रचिती शिवराज महाविद्यालयात आयोजित देशभक्ती व्यक्त करणाऱ्या समूहगीत गायनातून आला.यावेळी स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी शिवराज इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनीनी देशभक्तीपर नृत्य सादर करून या कार्यक्रमाची रंगत वाढविली. येथील शिवराज महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय समूहगीत गायन स्पर्धेत सावित्रीबाई फुले हायस्कूल करंबळी प्रथम क्रमांक पटकाविला. साई इंटरनॅशनल स्कूल व्दितीय तर साधना हायस्कूल गडहिंग्लजने तृतीय क्रमांक पटकाविला. तर वि.दि.शिंदे हायस्कूल गडहिंग्लज व संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेज गडहिंग्लजने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. विशेष प्रोत्साहनपर बक्षीस- शिवराज इंग्लिश मेडीयम स्कूल गडहिंग्लज.या सर्व विजेत्यांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे , प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, संचालक बसवराज आजरी, श्री.नंदनवाडे गुरुजी, प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, मुख्याध्यापिका सौ.गौरी शिंदे व अन्य मान्यवर यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी परीक्षक श्री.गोंधळी, दीपक चौगुले, सुप्रिया पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी परीक्षकांनी 'जिंदगी मौत ना बन जाये संभालो यारो....' या गीताने या सामुहिक गायनाला पुष्टी दिली. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व प्रा.किसनराव कुराडे लिखित पुस्तके देऊन सन्मानीत करण्यात आले. या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे देशभक्ती गीते सादर केली.या स्पर्धेचे उदघाटन स्वरसाधना संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य मच्छिंद्र बुवा, अमन युथ सर्कलचे सादिक लमतुरे, हबीब मकानदार, हारुण पटेल, शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा.टी.व्ही.चौगुले यांनी केले. प्रमुख अतिथी प्राचार्य मच्छिंद्र बुवा, शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिल कुराडे, युनूस नायकवडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी मार्गदर्शन केले.





