🔘मराठा मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय
| गडहिंग्लज: मराठा मंडळाच्या बैठकीस उपस्थित मंडळाचे अध्यक्ष किरणराव कदम यांच्यासह इतर पदाधिकारी. (छाया: मज्जिद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): नॉर्वे देशामध्ये नुकत्याच पार पडलेल्या अत्यंत खडतर अशा आयर्न मॅन स्पर्धेत यश मिळवून गडहिंग्लज व देशाचा नावलौकिक सातासमुद्रापार केल्याबद्दल गडहिंग्लजला मराठा मंडळाच्या वतीने आयर्न मॅन प्रकाश मोरे यांचे भव्य स्वागत व सत्कार समारंभ आयोजित करण्याचा निर्णय मराठा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
ही बैठक यशवंत बजार येथील सभागृहात पार पडली. यशस्वी उद्योजक असलेल्या व समाजाला दिशादर्शक असणाऱ्या प्रकाश मोरे यांच्या खडतर व संघर्षमय वाटचालीस सलाम करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. असा ठराव मंडळाचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष किरणराव कदम यांनी मांडला. त्यास चंद्रकांत सावंत यांनी अनुमोदन दिले. श्री मोरे यांचे हे यश दिशादर्शक असून गडहिंग्लज उपविभागाला प्रेरणादायी असल्याचा ठराव या बैठकीत संमत करण्यात आला.
यावेळी प्रा.शिवाजीराव भुकेले, डॉ. अजित पाटोळे, प्रा. यशवंत कोले, सतीश पाटोळे, ॲड. दिग्विजय कुराडे, संजय पाटील, दिलीप माने, प्रतापराव सरदेसाई, एल.डी.पोवार,अशोक खोत, प्रकाश पोवार, युवराज बरगे, प्रभाकर चव्हाण, दिगंबर पाटील, आनंदा माने, दयानंद पाटील, मदन शिंदे, अमृतराव शिंत्रे उपस्थित होते.


