Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मराठा मंडळाच्या बैठकीत विनायकराव मेटे यांना श्रद्धांजली

       गडहिंग्लज : येथे मराठा मंडळाच्या बैठकीस उपस्थित पदाधिकारी.  (छाया: मज्जिद किल्लेदार)

गडहिंग्लज (प्रतिनिधी): मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी आयुष्य समर्पित केलेल्या व खडतर वाटचाल असणाऱ्या आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती मृत्यूने मराठा समाजावर दुःखाचे डोंगर कोसळले असून ते भरून न येणारे नुकसान झाले आहे.  गडहिंग्लज मराठा मंडळाच्या बैठकीत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  विनायकराव मेटे यांचे विचार व कार्य पुढे नेटाने नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

 या बैठकीस मराठा मंडळाचे अध्यक्ष किरणराव कदम, उपाध्यक्ष प्रा.शिवाजीराव भुकेले, डॉ.अजित पाटोळे, ॲड. दिग्विजय कुराडे, प्रा. यशवंतराव कोले, दिलीप माने, सतीश पाटोळे, प्रतापराव सरदेसाई, संजय पाटील, एल.डी.पोवार, अशोक खोत, प्रकाश पोवार, युवराज बरगे, प्रभाकर चव्हाण, दिगंबर पाटील, आनंदा माने, दयानंद पाटील, भरत शिंदे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.