Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सकाळची गडहिंग्लज - तेरणी बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी

🔘सकाळी ८.५० च्या बुगडीकट्टी- गडहिंग्लज बसला प्रचंड गर्दी

🔘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने मोठी गर्दी

🔘वयोवृद्धांसह इतर प्रवाशांना उभे राहूनच करावा लागतो प्रवास


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन गडहिंग्लज आगाराने मध्यंतरी सकाळी सुरू केलेली गडहिंग्लज- तेरणी बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गांसह तेरणी ग्रामस्थातून होत आहे.

सध्या सकाळी ८.५० वाजता परत जाणारी गडहिंग्लज- बुगडीकट्टी ही बस महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह शालेय विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर आहे. मात्र बुगडीकट्टी, तेरणी परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने या बसला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तेरणीमध्येच ही बस खचाखच भरत आहे. परिणामी यामुळे कामानिमित्त गडहिंग्लजला जाणाऱ्या वयोवृद्धांसह इतर व्यक्तींना गडहिंग्लजपर्यंत खचाखच भरलेल्या या बसमधून थांबूनच प्रवास करावा लागत आहे.

यापूर्वी गडहिंग्लज आगाराने या परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या तसेच इतर प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन सकाळी ८.४० वाजता तेरणीतून सुटणारी बस सुरू केली होती. यामुळे सकाळी ८.५० वाजता बुगडीकट्टी वरून गडहिंग्लजला परत जाणाऱ्या बसवर ताण कमी पडत होता व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांची सोय होत होती. मध्यंतरी लॉकडाऊन पासून ही बस बंद करण्यात आली आहे.  गडहिंग्लज आगाराने या परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या व इतर प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन ही बस पूर्ववत सुरू करावी अशी मागणी या परिसरातील जनतेतून होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.