Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज स्कूल, छत्रपती शिवाजी विद्यालय, गिजवणे हायस्कूल अजिंक्य

⚽ क्रिएटिव्ह, सर्वोदया स्कूल उपविजेता 

⚽ के.के.सॉकर ट्रेनिंग सेंटर आयोजित फुटबॉल स्पर्धा 

⚽ ३२ संघांचा सहभाग

           (छाया: मज्जीद किल्लेदार) 

गडहिंग्लज( प्रतिनिधी):
कै.संदिप भोसले यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या शालेय फुटबॉल स्पर्धेत १० व १२ वर्षे वयोगटात शिवराज स्कूल, १४ वर्षे वयोगटात छत्रपती शिवाजी विद्यालय, १७ वर्षे वयोगटात गिजवणे हायस्कूल विजेता ठरले. तर क्रिएटिव्ह स्कूल व सर्वोदया स्कूल उपविजेता ठरले. या स्पर्धा शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडल्या. या स्पर्धेत एकूण ३२ संघानी सहभाग घेतला होता.

 अंतिम सामन्यात बारा वर्षाखालील गटात शिवराज विरुद्ध सर्वोदया स्कूल यांच्यामध्ये सामना झाला. या दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळ खेळला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना गोलचे खाते उघडता आले नाही. उत्तरार्धात शिवराज संघाने चिकाटीचा खेळ केला. यामध्ये मिळालेल्या संधीचा फायदा घेत शिवराज स्कूलच्या गणेश चव्हाणच्या पासवर श्रेयश केंगारे याने निर्णायक गोल करत संघाला विजय मिळवून दिला. १४ वर्षे वयोगटात छत्रपती शिवाजी विद्यालयाने बलाढ्य क्रिएटिव्ह स्कूलवर एक शून्य असा निसटता विजय मिळविला. प्रारंभी दोन्ही संघांनी सावध खेळ करत आपल्याकडे चेंडूचा ताबा ठेवला. छ. शिवाजी विद्यालयाकडून ऋतुराज अडसुळे, वेदांत धुंदरे तर क्रिएटिव्ह कडून समर्थ रोटे, विश्वजित बिलावर यांनी चांगला खेळ खेळला. 

१७ वर्षे गटातील गिजवणे हायस्कूलने शिवराज स्कूलवर १-० असा विजय मिळविला. संपूर्ण स्पर्धेत गिजवणे हायस्कूलने उत्तम खेळ केला.

बक्षीस वितरण प्रसंगी साहाय्यक फौजदार मारुती थिकारे, दिग्विजय कुराडे,रामदास वाघ,विजय शिवबुगडे,अशोक शिंदे,आदित्य मोहिते,सुनील कांबळे,सूर्याजी सरदेसाई,अनिल पाटील, प्रतीक्षा मालंडकर ,सुनीता नाईक, गौरी शिंदे उपस्थित होते.

स्पर्धा पार पाडण्यासाठी मौसिन नदाफ, रोहन साळो खे, आकाश चव्हाण यांनी परिश्रम घेतले. पंच म्हणून नौमान मुल्ला, आयान अत्तार, फझल नंदिकर यांनी काम पाहिले.किरण कावणेकर यांनी आभार मानले.

स्पर्धेमधील वयक्तिक बक्षिसे :

⚽१० वर्षे वयोगटात उत्कृष्ट खेळाडू : शारदुल देवार्डे (शिवराज)

⚽१२ वर्षे वयोगटात

गोल किपर : फरान नदाफ (शिवराज) 

उत्कृष्ट खेळाडू : विराज शिंदे (सर्वोदया)

मालिकावीर : अलोक पाटील (शिवराज)

⚽१४ वर्षे वयोगटात

गोल किपर : अनिरुद्ध पुजारी (शिवाजी)

बचाव पट्टू : समर्थ रोटे (क्रिएटिव्ह)

मालिकावीर : विश्वजित बिलावर (क्रिएटिव्ह)

⚽१७ वर्षे वयोगटात 

सामनावीर : वेदांत देसाई (शिवराज)

गोलकिपर : आकाश पाटील (गिजवणे)

मालिकावीर : प्रजवल जाधव (गिजवणे)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.