Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक यांना अभिवादन

गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन करताना प्रा. किसनराव कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम व इतर.

गडहिंग्लज( प्रतिनिधी):
येथील शिवराज महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात आले.

 प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना  डॉ.जी.पी.माळी म्हणाले, अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे विचार समाजात रुजणे आवश्यक आहे. अण्णाभाऊ साठे यांनी विपुल साहित्य निर्मिती करून समाजात जागृती आणि प्रबोधन केले. तर लोकमान्य टिळक यांनी राष्ट्र प्रेमाची भावना समाजात रुजवून ऐक्य निर्माण केले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक मराठी व प्रमुख डॉ. मनमोहन राजे यांनी केले. प्रा. किसनराव कुराडे म्हणाले, आजच्या तरुण पिढीने आधुनिक शिक्षण घेत असताना अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना विसरून चालणार नाही. मराठी साहित्य आणि इतिहासही तरुण पिढीने वाचला पाहिजे. त्यातूनच साठे, टिळक यांच्याबरोबरच इतर समाज सुधारकही समजतील. असे सांगितले.  यावेळी प्राचार्य डॉ. कदम यांचेही भाषण झाले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अशोक मोरमारे यांनी केले. आभार डॉ. श्रद्धा पाटील यांनी मानले. कार्यक्रमास प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, पर्यवेक्षक प्रा. टी.व्ही चौगुले, डॉ. सुधीर मुंज, डॉ. ए. जी. हारदारे, डॉ. एच.डी.सावंत, डॉ.एन.आर.कोल्हापूरे, प्रा. एन. बी. ईकिले, डॉ.आर.पी.हेंडगे, डॉ. बी.डी. अजळकर, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.