गडहिंग्लज(प्रतिनिधी): महागाव येथील संत गजानन महाराज पॉलिटेक्निक व अभियांत्रिकी महाविद्यालय आवारात महाराष्ट्र शासनाच्या वतीने चालू असलेल्या स्टार्टअप यात्रेच्या मोबाईल व्हॕनचे स्वागत प्राचार्य प्रा.डी.बी.केस्ती व डॉ.एस.एच.सावंत यांनी केले.
या नाविण्यपुर्ण यात्रेतून नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेऊन त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, नवसंकल्पनांना तसेच सुरुवातीच्या टप्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तंत्र मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे, उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे, असे उद्देश आहे. ज्या उमेदवारांनी नाविन्यपूर्ण असे उपक्रम केलेले आहे किंवा उपक्रम करण्यास इच्छुक आहेत, अशा उमेदवारांना त्यांचे कौशल्यप्रदर्शन करण्याची एक चांगली संधी यात्रेद्वारे मिळणार असल्याची माहिती समन्वयक प्रध्युम्न आढाव, प्रा.शिंदे, प्रा.बागल यानी दिली.
विद्यार्थ्यांच्या अधिक सहभागासाठी प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धा आयोजन केला असून अधिकाधिक विद्यार्थी सहभाग व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आला. यावेळी डॉ.श्रीकांत हेब्बाळकर,प्रा.रोहीणी पाटील, प्रा.कविता कुरळे, प्रा.सचिन मातले.प्रा.आमरसिंह फराकटे प्रा.संतोष गुरव यासह विभागप्रमुख विद्यार्थी उपस्थित होते.


