Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

यमकनमर्डी येथील युवकाची मोटरसायकल वरून पाठलाग करून हत्या

हत्तरगी (वार्ताहर) :  यमकनमर्डी येथील युवकाची रविवारी  सायंकाळी अज्ञात मारेकऱ्यानी मोटरसायकल वरून पाठलाग करत हत्या केली. या घटनेने या परिसरात खळबळ उडाली आहे. विनायक सोमशेखर होरकेरी (वय 28) असे त्या युवकाचे नाव आहे. या घटनेची नोंद यमकनमर्डी पोलिसात झाली आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी की, विनायक होरकेरी याचा शनिवारी वाढदिवस होता. रविवारी सायंकाळी विनायक हा मोटारसायकल वरून जात असताना त्याचा पाठलाग करत अज्ञात मारेकर्‍यांनी विनायकची हत्या केली. हतरगी पासून काही अंतरावरच ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील, यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक रमेश छायागोळ, पोलीस उपनिरीक्षक बी.व्ही.न्यामगौडा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाबाबत मार्गदर्शन केले. ही हत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे झाली हे अजूनही समजू शकलेले नाही. अधिक तपास यमकनमर्डी पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.