गडहिंग्लज (प्रतिनिधी): निलजी व गडहिंग्लज येथे बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी गडहिंग्लज पोलिसांनी दोघांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, निलजी येथे आनंदा कृष्णा बागडी ( वय 41) यांच्याकडून बेकायदा व बिगर परवाना देशी दारू 180 मिलीच्या 17 सीलबंद काचेच्या बाटल्या आढळून आल्या. पोलीस कॉन्स्टेबल दीपक किल्लेदार यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो.हे. कॉ. पाटील करत आहेत.
दरम्यान, दुसऱ्या एका कारवाईत गडहिंग्लज येथे संतोष नाना मांडे ( वय 41 राहणार उत्तूर, तालुका आजरा ) यांच्याकडून बेकायदा व बिगर परवाना दारू पोलिसांनी जप्त केली आहे. पो.हे. कॉ. देविदास धनवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
