Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी उपकेंद्रातील आरोग्य तपासणी शिबिरास चांगला प्रतिसाद

तेरणी: येथे आरोग्य उपकेंद्रात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिर प्रसंगी सरपंच मोसिम मुल्ला, सदस्य करवीर उथळे, ग्रामसेवक निवृत्ती कोंडुसकर, समुदाय आरोग्य अधिकारी अशरफअली शेख, एस.जी.एम हॉस्पिटलच्या अर्चना उघडे व त्यांचे कर्मचारी.   

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
तेरणी येथील आरोग्य उपकेंद्रात संत गजानन महाराज हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी ग्रामस्थांना हेल्थ कार्ड देखील काढून देण्यात आले.

या शिबिरात 30 वर्षावरील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी  एस.जी. एम हॉस्पिटलच्या अर्चना उघडे व त्यांचे कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी अशरफअली बाबू शेख, आरोग्य सेविका जयश्री कांबळे, किरण सुतार, सुपरवायझर कुंभार यांनी केले. शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सरपंच मोसिम मुल्ला, ग्रामसेवक निवृत्ती कोंडुस्कर व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे सहकार्य लाभले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.