Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रत्नागिरीचे अतिरिक्त सी.ई.ओ परिक्षीत यादव यांची तेरणी ग्रामपंचायत कार्यालयास सदिच्छा भेट

तेरणी : रत्नागिरीचे अतिरिक्त सीईओ परिक्षीत यादव यांचा सत्कार करताना ग्रामपंचायत सदस्य करवीर उथळे. यावेळी उपस्थित शंकर निंबाळकर यांच्यासह इतर.

गडहिंग्लज (प्रतिनिधी): 
रत्नागिरीचे अतिरिक्त सी.ई.ओ परिक्षीत यादव यांनी तेरणी ग्रामपंचायत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ग्रामपंचायत सदस्य करवीर उथळे यांनी श्री. यादव यांचे स्वागत केले. त्यांनी शाल व श्रीफळ देवून त्यांचा सत्कार केला.परिक्षीत यादव यांनी यापूर्वी गडहिंग्लज पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

यावेळी शंकर निंबाळकर, ग्रामविकास अधिकारी निवृत्ती कोंडूस्कर यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, इतर मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.