Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बुगडीकट्टी- गडहिंग्लज वाढीव बसफेरी उद्या पासून

"गडहिंग्लज बुलेटिन न्यूज" व ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश

तेरणी ग्रामस्थ व प्रवासी वर्गातून गडहिंग्लज आगाराच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त 


गडहिंग्लज (प्रतिनिधी ):
गडहिंग्लज आगाराने तेरणी व बुगडीकट्टी येथील विद्यार्थी व प्रवाशांची संख्या पाहत उद्या (दिनांक 27 सप्टेंबर) पासून सकाळी आठ वाजता बुगडीकट्टी- गडहिंग्लज वाढीव बसफेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत "गडहिंग्लज बुलेटीन न्यूज" व तेरणी  ग्रामपंचायतीने आगाराचे याकडे लक्ष वेधले होते. आगाराने याची दखल घेत  प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाढीव बसफेरी सुरू केल्याने ग्रामस्थांसह प्रवासी व विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

 येथील प्रवाशांची समस्या "गडहिंग्लज बुलेटिन न्यूज"ने वारंवार मांडली होती. तसेच सरपंच मोसिम मुल्ला, सदस्य करवीर उथळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी लेखी निवेदनाद्वारे आगाराचे याकडे लक्ष वेधत वाढीव बसफेरी सुरू करण्याची मागणी केली होती. याचा पाठपुरावा देखील केला होता. याची दखल घेत गडहिंग्लज आगाराच्या अधिकाऱ्यांनी तेरणी येथे प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थी संख्या व इतर प्रवाशांची संख्या याची नोंद घेतली होती. प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केल्यानंतर आगाराने ही वाढीव बसफेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सरपंच मोसिम मुल्ला यांना आगार प्रमुखांनी कळवले आहे.       

बुगडीकट्टी - गडहिंग्लज ही  वाढीव बस सकाळी आठच्या दरम्यान बुगडीकट्टी येथे पोहोचेल व  ठिक 8:15 वा. तेरणीत येईल. त्यानंतर गडहिंग्लजला मार्गस्थ होईल. या सेवेचा लाभ विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन सरपंच मोसिम मुल्ला व आगारप्रमुख यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.