🔘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्याने आनंदोत्सव
🔘फटाक्यांची आतषबाजी, साखर व पेढे वाटप

भडगाव: येथे शिवसेनेच्या वतीने साखर व पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करताना शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख वसंत नाईक यांच्यासह शिवसैनिक.
गडहिंग्लज (प्रतिनिधी):शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यामुळे भडगाव येथे शिवसैनिकानी आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी भडगाव शिवसेना शाखेच्यावतीने फटाके वाजवत व साखर, पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, विभाग प्रमुख मलिकार्जुन चौगुले, शाखाप्रमुख बसवराज स्वामी, कल्लाप्पा कांबळे, महादेव स्वामी, महेश कोरी, राजकुमार बंदी उपस्थित होते.

