Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नौकुड गावची अनोख्या उपक्रमामुळे जिल्ह्यात चर्चा


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
गडहिंग्लज तालुक्यातील नौकुड गावाने थकित घरफाळा व पाणीपट्टी वसुलीसाठी एक अनोखा उपक्रम राबविल्याने हे गाव कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेत आले आहे. 

येथील ग्रामपंचायतीने थकित घरफाळा व पाणीपट्टी वसुली गतीने होण्यासाठी एक नामी शक्कल लढवली. ती म्हणजे दीपावली निमित्त ग्रामस्थांना लकी ड्रॉ पद्धतीने भेटवस्तू देण्याची योजना आखली. थकित तसेच चालू घरफाळा व पाणीपट्टी वेळेत भरणाऱ्या ग्रामस्थांसाठी लकी ड्रॉ पद्धतीने सोडत जाहीर करण्यात आली. या उपक्रमाला ग्रामस्थांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. या माध्यमातून जवळपास पंचवीस टक्के वसुली झाल्याची माहिती सरपंच शुक्राचार्य चोथे यांनी दिली.

या लकी ड्रॉमध्ये अर्जुन आप्पय्या दिवटी, बाळकृष्ण भरमा मांगले, तानाजी गोपाळ चव्हाण, धोंडिबा बाळू चव्हाण, शुक्राचार्य अर्जुन चव्हाण यांनी अनुक्रमे विजेते ठरले.  त्यांना भेटवस्तू म्हणून साखर, रवा, हरभरा डाळ, तेल, रांगोळी व पणती इत्यादी भेटवस्तू देण्यात आल्या. स्वागत व प्रास्ताविक ग्रामसेवक विजय जाधव यांनी केले. सर्व ग्रामस्थांनी या अनोख्या उपक्रमाला प्रतिसाद देत घरफाळा व पाणीपट्टी  भरल्याने आभार व्यक्त करत यापुढेही असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी सरपंच शुक्राचार्य चोथे यांनी देखील मार्गदर्शन केले.

यावेळी उपसरपंच सौ.रेखा सागर सरदेसाई, ग्रा.पं सदस्या सौ. हिराबाई चौगुले, सौ.सुरेखा गुरव, सौ.सुवर्णा गोसावी, ग्रा.पं.सदस्य विजय गुरव, तंटामुक्त अध्यक्ष सखाराम केसरकर, बाबू बिरंजे, ग्रामपंचायत कर्मचारी विनोद चोथे, रमेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार शंकर कांबळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.