Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांचा शनिवारी करण्यात येणार गौरव

नेत्रदान चळवळीच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन 

अत्याळ येथे सायंकाळी सात वाजता कार्यक्रम

अंधांसाठी स्वयंसिद्धता कार्यशाळाही घेण्यात येणार

'ब्रेल मॅन ऑफ इंडिया' स्वागत थोरात(मुंबई) यांची उपस्थिती 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
नेत्रदान चळवळीच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त अत्याळ( तालुका गडहिंग्लज) येथे शनिवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांना गौरवपत्र प्रदान तसेच अंधांची स्वयंसिद्धता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

यावेळी नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांना 'ब्रेल मॅन ऑफ इंडिया' स्वागत थोरात(मुंबई) यांच्या हस्ते गौरव पत्र प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास गडहिंग्लज येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. सदानंद पाटणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

यावेळी कै. संभाजी पाटील, लक्ष्मीबाई गाडीवड्ड, नारायण पाटील, विष्णू बिडकर, आनंदीबाई पाटील (अत्याळ), कै. आप्पासाहेब कानडे, कल्लाप्पा मगदूम, लक्ष्मण कुंभार, लक्ष्मीबाई केसरकर (बेळगुंदी), कै. नानासाहेब जाधव, शैला हत्तरकी, अरुण हिडदुग्गी, सुरेश करगावे(गडहिंग्लज), कै. कुणाल जाधव, बंडू कुराडे, गौराबाई पालकर, विष्णू सूर्यवंशी (ऐनापूर), कै. कृष्णाबाई देसाई, नानासाहेब पाटील, पार्वती देसाई (सरोळी), कै.आक्कूबाई येसरे, कै. बायाक्का येसरे (कौलगे), कै. विरुपाक्ष नाईक, शांताबाई आंबी (भडगाव), कै.मधुकर पोकळे (उत्तुर), कै. अण्णाप्पा मोरे (लिंगनूर), कै. भीमा गुरव (मडिलगे), कै. गणपती गायकवाड(हिरलगे), कै. महादेव कोरे(शेंडूर), कै. लता पाटील(इंचनाळ), कै. शांताबाई कदम (करंबळी), कै. आऊबाई कोरी (उंबरवाडी )  या नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांना गौरवपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.