Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज साखर कारखान्यासाठी दुरंगी लढत

कोणते पॅनल कोणाच्या नेतृत्वाखाली👇

छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडी :

माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ, डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाशराव चव्हाण, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, अप्पी पाटील गट, प्रा. किसनराव कुराडे, सदानंद हत्तरकी, संग्रामसिंह कुपेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्यानावर.

श्री.काळभैरव शेतकरी, कामगार विकास आघाडी:

आमदार राजेश पाटील, माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे, संग्रामसिंह नलवडे, शिवाजीराव खोत


गडहिंग्लज (प्रतिनिधी): 
आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट झाले. माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ व आमदार राजेश पाटील यांनी एकमेकांविरोधात आघाडी स्थापन करत आमने- सामने आल्याचे स्पष्ट झाले.

माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ व डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या नेतृत्वाखाली प्रकाशराव चव्हाण, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, अप्पी पाटील गट, प्रा. किसनराव कुराडे, सदानंद हत्तरकी, संग्रामसिंह कुपेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्यानावर हे सर्वजण एकत्र येत छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीची स्थापना केली आहे. तर विरोधात आमदार राजेश पाटील, माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे, संग्रामसिंह नलवडे, शिवाजीराव खोत यांच्या नेतृत्वाखाली श्री.काळभैरव शेतकरी, कामगार विकास आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे कारखान्यासाठी दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.  

आज माघारीची अंतिम तारीख होती. या पार्श्वभूमीवर दोन्हीही आघाड्यांनी आपापले उमेदवार जाहीर केले.  

छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे उमेदवार:

व्यक्ती उत्पादक सभासद मतदारसंघ : कौलगे कडगाव गट - प्रकाश श्रीपाद शहापूरकर ( कौलगे), विश्वनाथ बाळय्या स्वामी (इंचनाळ), बाळासो दौलत देसाई(कडगाव), गडहिंग्लज- हनिमनाळ गट: शिवराज मलगोंडा पाटील(गडहिंग्लज), अशोक शंकरराव मेंडूले(गडहिंग्लज), अक्षयकुमार सरदार पाटील(मुत्नाळ), भडगाव- मुगळी गट: प्रकाश भीमराव चव्हाण (चन्नेकुप्पी), सतीश भीमगोंडा पाटील(गिजवणे), नूल- नरेवाडी गट: रवींद्र बाबासो पाटील (कडलगे), सदानंद राजकुमार हत्तरकी(हलकर्णी), महागाव हरळी गट : भरमू कृष्णा जाधव(तावरेवाडी ), प्रकाश धोंडीराम पताडे( महागाव ), विद्याधर बाबुराव गुरबे ( शिप्पूर तर्फ नेसरी ). उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक सहकारी संस्था मतदारसंघ: सोमनाथ विनायक पाटील ( महागाव ), अनुसूचित जाती किंवा जमाती मतदारसंघ- काशिनाथ शिवाप्पा कांबळे (हरळी खुर्द), महिला सदस्य मतदार संघ - सौ कविता प्रकाश पाटील (अत्याळ), सौ. मंगल बसवराज आरबोळे (तनवडी), इतर मागासवर्गीय मतदारसंघ - दिग्विजय किसनराव कुराडे (ऐनापूर), भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष  मागास प्रवर्ग मतदारसंघ- अरुण प्रभाकर गवळी( हेब्‍बाळ कसबा नूल )

श्री.काळभैरव शेतकरी, कामगार विकास आघाडीचे उमेदवार : कौलगे कडगाव गट - अशोक सखाराम देसाई ( हिरलगे ), विकास पाटील (अत्याळ), सुजित शामराव देसाई  ( इंचनाळ), गडहिंग्लज- हनिमनाळ गट : संग्रामसिंह नलवडे( हनिमनाळ ), शिवाजीराव दशरथ खोत ( बड्याचीवाडी ), विजय बाळासाहेब मोरे (गडहिंग्लज), भडगाव- मुगळी गट:  अमरसिंह रामचंद्र चव्हाण ( चनेकुप्पी ), बाबासाहेब पाटील ( गिजवणे ), नूल- नरेवाडी गट: रणजीत यादव (नूल ), वसंतराव चौगुले( बसर्गे ), महागाव- हरळी गट : बाळकृष्ण परीट ( हरळी ), प्रदीप पाटील ( वाघराळी), संदीप शिंदे (सरोळी), उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक : शिवाजीराव खोत ( बड्याचीवाडी), अनुसूचित जाती जमाती : परसू कांबळे ( हसुरचंपू ), महिला प्रतिनिधी: शुभांगी देसाई (महागाव ), गीता बाबासो पाटील ( मुगळी ),इतर मागासवर्गीय : संजय सुरेश बटकडली( कडगाव ), भटक्या विमुक्त जमाती : संभाजी नाईक (मुत्नाळ).

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.