गडहिंग्लज (प्रतिनिधी): कळविकट्टे ( तालुका गडहिंग्लज ) येथे वैभव नारायण पाटील (वय 20 ) या युवकाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. याची वर्दी नारायण संतू पाटील यांनी गडहिंग्लज पोलिसात दिली आहे. या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मयत वैभव पाटील हा दिनांक 27 ऑक्टोबर रोजी मद्य प्राशन करून घरी आला होता. या नशेत त्याला जेवता येत नसल्याने नारायण पाटील यांनी वैभवला दारू प्राशन न करण्याचा सल्ला देत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता. याचा राग मनात धरत वैभव याने घराशेजारील जनावरांच्या गोठ्यातील लाकडी वाशाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचा पुढील तपास पो.हे. कॉ कांबळे करत आहेत.
