Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पुण्यातील साहित्य संमेलनात गडहिंग्लजच्या अनिल कलकुटकी यांच्या कवितेने मिळविली वाहवाह!

येरवडा येथे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

श्री.कलकुटकी यांनी सादर केली "जलम" कविता 


पुणे (प्रतिनिधी):
येरवडा पुणे येथे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले. या संमेलनात विविध कवींनी आपले काव्य सादर केले. दरम्यान, गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयाच्या अनिल कलकुटकी यांनी  "जलम" ही कविता सादर करत उपस्थितांची वाहवाह मिळवली. हे संमेलन विविध सत्रांमध्ये संपन्न झाले.       

या संमेलनात मावळते अध्यक्ष टी. एस. चव्हाण, नुतन अध्यक्ष प्रा.शशिकांत जाधव, दिल्ली विद्यापीठाचे व्ही.नारायण अप्पा, कामराज विद्यापीठ मदुराईचे प्रा. उमा राज, ओसिसीआय बेंगलोरचे राष्ट्रीय सल्लागार नरसिंहराव गुंगी, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी शिवरुद्राय स्वामी, वड्डे बालनरसिंहडू हैद्राबाद, स्वागत अध्यक्ष राकेश विटकर यांच्यासह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.

 व्हिडिओ पाहण्यासाठी येथे 👇क्लिक करा 

सकाळी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. संमेलनाचे उदघाटन भटक्या विमुक्त कल्याण बोर्ड भारत सरकार नवी दिल्लीचे चेअरमन दादासाहेब आदिती यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बाबाजी धोत्रे (रोहा रायगड) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनामध्ये अंकिता कुसाळकर अहमदनगर , सुरेश वडर पुनाळ पन्हाळा , ह्रषिकेश पवार-सातारा,शरद जाधव अहमदपूर, रमेश कट्टीमनी मिरज, अशोक कुसाळकर, अनिल कलकुटकी (गडहिंग्लज ),  अविनाश लष्करे यांच्यासह अन्य कवीनी आपल्या काव्यरचना सादर केल्या.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.