Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमधील किल्ले बांधणी स्पर्धेत नदीवेसचा "आम्ही मावळे ग्रुप" प्रथम


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
हिरण्यकेशी फौंडेशन व 'माझं गडहिंग्लज'च्या वतीने गडहिंग्लज शहर मर्यादित भव्य किल्ले बांधणी स्पर्धा 2022 प्रचंड उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत 41 स्पर्धकांनी सहभाग घेतला. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि आकर्षक ट्रॉफी देण्यात आली.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक -आम्ही मावळे ग्रुप, नदीवेस    (गडहिंग्लज), द्वितीय  क्रमांक- समर्थ तरुण मंडळ धबधबा मार्ग (लाखेनगर गडहिंग्लज), तृतीय क्रमांक- आझाद तरुण मंडळ (गडहिंग्लज)तर  उत्तेजनार्थ - श्री शिवाजी महाराज बालतरुण मंडळ (गडहिंग्लज), हाळलक्ष्मी तरुण मंडळ (गडहिंग्लज), BAFC भीमनगर (गडहिंग्लज) यांनी मिळवले.

स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी  सुनील चौगुले, कावेरी चौगुले, प्रशांत बाटे, आदेश विचारे, सुशील देवार्डे यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेचे परीक्षण आदेश विचारे, सुशील देवार्डे, श्रीधर कुंभार यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.