Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला बाळासाहेबांची शिवसेना यांच्या वतीने कर्नाटकच्या दडपशाहीचा निषेध

बेळगाव सीमा बांधवांच्या वतीने पाळण्यात येणाऱ्या काळा दिनाला पाठिंबा 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
बेळगाव येथील सीमा बांधवांकडून पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनाला गडहिंग्लज येथील बाळासाहेबांची शिवसेना यांच्यावतीने पाठिंबा देत कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला.   

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना कार्यकर्त्यांनी बेळगाव, बिदर, भालकी, निपाणी, कारवार, खानापूरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत कर्नाटक सरकारचा निषेध केला. ‌यावेळी कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून काळा दिन पाळला.

 बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे👇 क्लिक करा 

यावेळी तालुका प्रमुख संजय संकपाळ, शहर प्रमुख अशोक शिंदे, सागर कुराडे, संजय पाटील, दयानंद पाटील, राहुल खोत, वसंत शेटके ,अमित बचाटे, सचिन पवार ,हेमंत हावळ, दत्ता कोरवी , उदय महाडिक, प्रकाश कांबळे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.