Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमधील फुटबॉल स्पर्धेत मंगळूर येनीपोया विद्यापीठ विजेता

⚽️युनायटेड करंडक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा

⚽️बंगळूर उपविजेता, गोव्याचा साळगावकर संघ तिसरा

                         (छायाचित्र: अशपाक किल्लेदार )

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथे आयोजित युनायटेड करंडक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत मंगळूर येथील येनीपोया विद्यापीठाने बंगळूरच्या किक स्टार्ट एफसीला टायब्रेकरमध्ये 4-2 असे नमवून विजेता ठरला. गोव्याच्या साळगावकर संघाने यजमान गडहिंग्लज युनायटेडला एका गोलने हरवून तिसरा क्रमांक मिळविला. विजेत्या संघाला रोख  75 हजार व प्रतिष्ठेचा युनायटेड करंडक प्रदान करण्यात आला. उपविजेत्या बेंगळूर संघाला रोख  55 हजार, साळगावकर संघाला 30 हजार तर युनायटेडला 20 हजार रुपये आणि करंडक देण्यात आला. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत गेले पाच दिवस ही स्पर्धा एम.आर. हायस्कूलच्या मैदानावर पार पडली. या स्पर्धेचे यंदाचे 17 वे वर्ष होते.

अंतिम सामना पूर्ण वेळ चुरशीचा झाला. उत्तरार्धात दोन्ही संघांनी पेनल्टीवर गोल केले. बंगळूरच्या प्रशांत कलिंगा तर मंगळूरच्या एमडी हासिल यांनी गोल करून सामना बरोबरीत ठेवला. दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केल्याने उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. टायब्रेकरमध्ये मंगळूरच्या हासिल, हसन, रियाज अरुण यांनाच गोल करता आले. मंगळूरचा गोलरक्षक मनोज गौडा याने पेनल्टीचे दोन फटके अडवून विजेतेपदात सिंहाचा वाटा उचलला.

तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात गोव्याच्या साळगावकर संघाचा उमंग गायकवाडने केलेल्या निर्णायक गोलद्वारे युनायटेडवर मात केली.

या स्पर्धेत स्पर्धावीर म्हणून जॉन्सन (बेंगळूर), उत्कृष्ट गोरक्षक मनोज गौडा (मंगळूर), उत्कृष्ट बचावपटू इरफान (मंगळूर), उत्कृष्ट मध्यरक्षक उमंग गायकवाड (साळगावकर), आघाडीपट्टू एन. गौबा (मंगळूर), उदयोन्मुख खेळाडू क्रिस्पिन क्लीटस (बेंगळूर), सर्वाधिक गोल सुनील कुमार (बेंगळूर) तर सर्वाधिक गोल करणाऱ्या सुनील कुमार (बेंगळूर) या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.      

स्पर्धेतील विजेत्या संघांना  गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर, उद्योजक मुरारी चिकोडे, संजय घोडावत समूहाचे प्रतिनिधी प्रवीण रेंदाळे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. नागेश पट्टणशेट्टी, रियाजभाई शमनजी, मोहन कांबळे, अविनाश केसरकर, जालिंदर शिंदे, संभाजी शिवारे यांच्यासह खेळाडू व शौकीन उपस्थित होते.

सचिव दीपक कुप्पन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची माहिती दिली. युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लद यांनी स्वागत केले. स्पर्धा समन्वयक अभिजीत चव्हाण, सुरज तेली यांचा गौरव करण्यात आला. संचालक सुरेश कोळकी यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी युनायटेड च्या खेळाडूंनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.