Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पतंग... पतंग.. घुमवूया पतंग...!

 गाण्याची चाल वेधून घेत आहे सर्वांचे लक्ष   


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
वाचक हो विठ्ठल... विठ्ठल.. विठ्ठल... विठ्ठल..! हे गाणं आपण ऐकलं असाल. हे गाणं ऐकलं की  आपण पांडुरंगाशी एकरूप झाल्याचा काही काळ भास देखील होतो, आपण तल्लीन होतो व त्या विठू माऊलीची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. ह्याच गाण्याच्या तालीवर तालुक्यात सध्या पतंग.... पतंग... पतंग... घुमवूया पतंग...! हे गाणं गल्लीबोळातून कानी पडत आहे. अन चटकन सर्वांचे कान त्या गाण्याकडे खेचले जात आहेत.

याचे कारणही असेच आहे. सध्या तालुक्यात आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज  तालुका सहकारी साखर कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीचा प्रचार शिगेला  पोहोचला आहे. ही निवडणूक दुरंगी होत आहे. चंदगडचे आमदार राजेश पाटील, जनता दलाचे माजी आमदार व साखर कारखान्याचे माजी चेअरमन अॅड. श्रीपतराव शिंदे, माजी व्हाईस चेअरमन संग्रामसिंह नलवडे, सेवानिवृत्त कामगार संघटनेचे नेते शिवाजीराव खोत यांच्या नेतृत्वाखाली श्री. काळभैरव शेतकरी, कामगार विकास आघाडी निवडणूक रिंगणात आहे. या आघाडीचे चिन्ह हे "पतंग" आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी विठ्ठल... विठ्ठल..! या गाण्याच्या चालीवर पतंग... पतंग.. ही चाल  सुंदररित्या बसविण्यात आली आहे. रिक्षाच्या माध्यमातून हे गाणे गावागावातील गल्लीबोळात वाजत असल्याचे दिसत आहे. ही गाण्याची चाल लागताच सर्वांचे लक्ष त्याकडे वेधून घेत आहे . एकंदरीत पतंग... पतंग.... घुमवूया...पतंग..ही गाण्याची चाल बसविणाऱ्यांनी अतिसुंदर बसविल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.