Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला शनिवारपासून महिलांच्या क्रिकेट स्पर्धा


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
  येथे शहर, तालुका क्रिकेट असोसिएशन, गडहिंग्लज हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 5 नोव्हेंबर पासून वरिष्ठ गट महिलांसाठी राजमाता चषक 20 -20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

विजेत्यांना चषक व आकर्षक बक्षिसे तसेच मालिकावीर, बेस्ट बॅटर, बॉलर, विकेटकिपर, फिल्डर म्हणून गौरवण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूर ,बेळगाव व तालुका असोसिएशन संघाचा सहभाग असणार असून अंतिम सामना कोल्हापुर येथील शास्त्रीनगर मैदानात होणार आहे. याचे थेट प्रक्षेपण यूट्यूब चॅनेलवर होणार आहे. तरी इच्छुक संघानी संपर्क साधावा असे आवाहन मिलिंद कोरी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.