Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा: फॉस्फेट आणि पोटॅश खतांसाठी अनुदान मंजूर

केंद्र सरकारकडून 51,875 कोटी रुपये अनुदान मंजूर


नवी दिल्ली (सौजन्य : पीआयबी):
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नत्र (N), फॉस्फरस(P), पोटॅश  (K) आणि गंधक (S) या विविध पोषक घटकयुक्त फॉस्फेट आणि पोटॅश  खतांसाठी पोषक तत्वांवर आधारित अनुदानाच्या (NBS) प्रति किलोग्रॅम दराच्या खत विभागाच्या प्रस्तावाला रब्बी हंगाम करिता मंजुरी दिली आहे. 

रब्बी हंगामसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने पोषक तत्वांवर आधारित अनुदान म्हणून मालवाहतूक अनुदानाद्वारे स्वदेशी खताला (SSP) पाठबळासह 51,875 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामुळे  शेतकऱ्यांना खतांच्या अनुदानित, परवडणाऱ्या किमतीत सर्व फॉस्फेट आणि पोटॅशयुक्त खतांची सहज उपलब्धता शक्य होईल आणि कृषी क्षेत्राला आधार मिळेल. खते आणि कच्च्या मालाच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील अस्थिरता प्रामुख्याने केंद्र सरकारने विचारात घेतली आहे. सरकार खत उत्पादक, आयातदारांमार्फत शेतकऱ्यांना अनुदानित किमतीत फॉस्फेट  आणि पोटॅश खतांसाठी युरिया 25 ग्रेडची खते उपलब्ध करून देत आहे.

फॉस्फेट आणि पोटॅश  खतांवरील अनुदान हे 01-04-2010 पासून पोषक तत्वांवर आधारित अनुदान योजनेद्वारे नियंत्रित केले जाते. शेतकरी हिताच्या दृष्टीकोनानुसार, शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत फॉस्फेट आणि पोटॅश  खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. खते आणि  युरिया,  डीएपी, एमओपी आणि गंधक या कच्च्या मालाच्या  आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे सरकारने डीएपीसह फॉस्फेट आणि पोटॅश  युक्त खतांवर अनुदान वाढवून वाढीव किमतीचा बोजा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. खत कंपन्यांना मंजूर दरांनुसार अनुदान दिले जाईल जेणेकरून ते शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते उपलब्ध करून देऊ शकतील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.