Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगावात ऑननरी लेफ्टनंट शंकर चोथे यांचा नागरी सत्कार


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
नुकतेच सैन्य दलातून  सेवानिवृत्त झालेले भडगावचे सुपुत्र ऑननरी लेफ्टनंट शंकर रामचंद्र चोथे यांचा भडगावात नागरी सत्कार करण्यात आला.

शंकर चोथे हे भारतीय सैन्य दलात चार मराठा लाईट इन्फंट्री बटालियन मधून 28 वर्षे देश सेवा बजावत ऑननरी लेफ्टनंट  या पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त भडगावमध्ये  प्रथमच सन 1993- 94 च्या इयत्ता दहावी बॅचमधील मित्रमंडळींनी त्यांचे जंगी स्वागत करून सत्कार केला. फुलांनी सजवलेल्या उघड्या जीपमधून श्री.चोथे यांचा सपत्नीक मिरवणुकीने जंगी स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीत लेझीम पथक, केंद्रशाळा व कल्लेश्वर हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक व माजी सैनिक संघटना, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, विविध संस्था, तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह  ग्रामस्थांनी ठिकठिकाणी उभे राहत पुष्पगुच्छ व हार घालून स्वागत केले.

यावेळी रामाप्पा करिगार, अमर चव्हाण, सरपंच बसवराज हिरेमठ, पोलीस पाटील उदय पुजारी, अनिकेत कोणकेरी, प्रकाश चव्हाण, राजू खमलेट्टी, रवींद्र शेंडुरे, सुभाष चोथे, गणपतराव पट्टणकुडी, सुरेश मगदूम, पांडुरंग कापसे, तिप्पाना कोटगी, दयानंद पट्टणकुडी, सचिन हरळीकर, मोहन पोवार, राजशेखर कित्तूरकर, नारायण माधीहाली, अनिल तराळ, कुमार चोथे, वसंत नाईक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.