⛔ गडहिंग्लज साखर कारखान्यावर छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीची एकहाती सत्ता
⛔ प्रचंड मताधिक्य देत सभासदांनी आमदार मुश्रीफ यांच्यावर दाखविला विश्वास
⛔ ऐतिहासिक विजयाने तालुक्यात कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष
⛔ आमदार मुश्रीफ यांचे बेरजेचे राजकारण ठरले फलदायी
⛔ तब्बल 14 तास चालली मतमोजणी प्रक्रिया
![]() |
| (छायाचित्र : अशपाक किल्लेदार ) |
गडहिंग्लज (संतोष नाईक) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यावर माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ, डॉ. प्रकाश शहापूरकर, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, अप्पी पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्यानावर यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीने वर्चस्व प्राप्त केले. प्रचंड मताधिक्यांनी सर्वच्या सर्व 19 जागांवर विजय मिळवत कारखान्यावर एकहाती सत्ता प्रस्थापित करण्यात माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांना यश आले आहे. विरोधी श्री. काळभैरव शेतकरी, कामगार विकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. मतमोजणी प्रक्रिया येथील गांधीनगर पॅव्हेलियन हॉलमध्ये पार पडली. सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतमोजणी रात्री साडेदहाच्या सुमारास संपली. तब्बल 14 तास ही मतमोजणी प्रक्रिया चालली.
![]() |
| (छायाचित्र: अशपाक किल्लेदार) |
विजयी उमेदवार व मते -✌
कौलगे- कडगाव उत्पादक गट-
प्रकाश शहापूरकर- 10400
बाळासाहेब देसाई- 9766
विश्वनाथ स्वामी- 9318
➖➖➖➖➖➖➖➖
गडहिंग्लज-हनिमनाळ उत्पादक गट-
अशोक मेंडुले- 9400
शिवराज पाटील- 9519
अक्षयकुमार पाटील- 9440
➖➖➖➖➖➖➖➖
भडगाव- मुगळी उत्पादक गट-
प्रकाश चव्हाण- 9267
सतीश पाटील- 9043
➖➖➖➖➖➖➖➖
नूल- नरेवाडी उत्पादक गट-
सदानंद हत्तरकी-9848
रविंद्र पाटील- 9711
➖➖➖➖➖➖➖➖
महागाव- हरळी उत्पादक गट-
विद्याधर गुरबे-10301
प्रकाश पताडे- 9924
भरमु जाधव- 9611
➖➖➖➖➖➖➖➖
महिला प्रतिनिधी -
मंगल आरबोळे- 10074
कविता पाटील-9698
➖➖➖➖➖➖➖➖
इतर मागास प्रतिनिधी -
दिग्विजय कुराडे- 10053
➖➖➖➖➖➖➖➖
अनुसूचित जाती/ जमाती प्रतिनिधी-
काशिनाथ कांबळे-10484
➖➖➖➖➖➖➖➖
भटक्या विमुक्त जाती/ जमाती प्रतिनिधी -
अरुण गवळी-10309
➖➖➖➖➖➖➖➖
उत्पादक संस्था, बिगर उत्पादक गट-
सोमनाथ पाटील-199
➖➖➖➖➖➖➖➖
सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिली मोजणी संस्था गटाची करण्यात आली. यामध्ये आमदार मुश्रीफ पुरस्कृत छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे उमेदवार सोमनाथ पाटील हे श्री. काळभैरव आघाडीच्या शिवाजी खोत यांचा पराभव करत विजय मिळविला. सोमनाथ पाटील यांना 199 मते तर शिवाजी खोत यांना 37 मते मिळाली. 1 मत बाद ठरले. छत्रपती शाहू समविचारी आघाडीने सोमनाथ पाटील यांच्या माध्यमातून निकालाच्या सुरुवातीलाच आपले खाते खोलत विजयाचा गुलाल उधळला.
![]() |
| (छायाचित्र: अशपाक किल्लेदार) |
छत्रपती शाहू आघाडीची ही विजयाची घोडदौड शेवटपर्यंत कायम राहिली. 1 ते 34 या पहिल्या फेरीत छत्रपती शाहू समविचारी आघाडीचे सर्वच गटातील उमेदवार मोठ्या फरकाने आघाडीवर राहिले. रात्री आठच्या दरम्यान पहिल्या फेरीची मतमोजणी संपली. त्यानंतर दुसरी फेरी घेण्यात आली. यामध्ये देखील शाहू आघाडीच्या उमेदवारांचे मताधिक्य वाढतच गेले. अखेर रात्री दहाच्या सुमारास मतमोजणी प्रक्रिया संपली. त्यानंतर अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला.
![]() |
| (छायाचित्र: अशपाक किल्लेदार) |
जसजसे उमेदवारांचे मताधिक्य वाढू लागले तस तसे छत्रपती शाहू समविचारी आघाडीचे कार्यकर्ते गांधीनगर पॅव्हेलियन हॉलबाहेर तसेच शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंद उत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला होता. कारखाना निवडणुकीमुळे गडहिंग्लज शहरातील वातावरण निवडणूकमय झाले होते. पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी केंद्राबाहेर तसेच शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शिवराज पाटील यांची घोड्यावरून मिरवणूक
दरम्यान, गडहिंग्लज- हनिमनाळ गटातील उमेदवार शिवराज पाटील यांची रात्री कार्यकर्त्यांनी घोड्यावरून विजयी मिरवणूक काढली. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला. घोड्यावरून निघालेली मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
नेतेमंडळी व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास खरा ठरला
रविवारी मतदानानंतर छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे उमेदवार व माजी जि.प. उपाध्यक्ष सतीश पाटील, प्रकाशराव चव्हाण, उदयराव जोशी, विनायक उर्फ आप्पी पाटील, बसवराज आजरी, प्रा.अशपाक मकानदार, रामगोंडा उर्फ गुंड्या पाटील, महेश सलवादे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्यानावर आदींसह कार्यकर्त्यांनी प्रचंड मताधिक्यांनी नक्की विजय हा छत्रपती शाहू आघाडीचाच होणार असून केवळ निकालाची औपचारिकता बाकी असल्याचे म्हटले होते. त्यांच्या बोलण्यातूनही हा आत्मविश्वास ठळकपणे दिसत होता. मतदानानंतर निकालापूर्वीच रविवारी एम.आर. हायस्कूल केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी देखील केली होती. आजच्या निकालानंतर यावर शिक्कामोर्तब झाल्याने छत्रपती शाहू आघाडीचे नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला विजयाचा आत्मविश्वास तंतोतंत खरा ठरल्याने याची चर्चा होताना दिसत होती.




