Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडी विजयाच्या दिशेने सुसाट

मतमोजणी प्रक्रिया अजून सुरूच

रात्री दहा वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना निवडणूक मतमोजणी प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत हाती आलेल्या मतांच्या आकडेवारीनुसार माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे उमेदवार सर्वच गटातून आघाडीवर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे छत्रपती शाहू आघाडीची एक हाती विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. रात्री दहा वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. 

सकाळी पहिला निकाल संस्था गटातून आमदार मुश्रीफ यांच्या छत्रपती शाहू आघाडीच्या बाजूने लागला. संस्था गटातून सोमनाथ पाटील विजय झाले. येथूनच या आघाडीची गोड सुरुवात झाली. आतापर्यंत हाती आलेली मतांची आकडेवारी पाहता छत्रपती शाहू आघाडी एक हाती विजयाच्या दिशेने सुसाट धावत असल्याचे दिसत आहे. अजूनही जवळपास 33 केंद्रांची मतमोजणी बाकी आहे. मतमोजणी प्रक्रिया गतीने सुरू आहे. छत्रपती शाहू आघाडीचे कार्यकर्ते गुलाल उधळून जल्लोष करत असल्याचे दिसत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.