Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज शहरातील रस्त्यांची दुरुस्ती सुरू


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
गडहिंग्लज शहरात विविध ठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे मुजवण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. या संदर्भात शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) याकडे लक्ष वेधत आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान, पालिकेने काम हाती घेतल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.

गडहिंग्लज शहर हे वैद्यकीय तसेच शैक्षणिक दृष्ट्या उपविभागात एक महत्त्वाचे शहर आहे. सीमाभागात मिरची बाजारासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. राज्यात वैद्यकीयदृष्ट्या प्रगत असणारे शहर म्हणून गडहिंग्लजची एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे शहरात सीमा भागासह उपविभागातून नागरिकांची दररोज विविध कामांसाठी मोठी गर्दी असते. परिणामी शहरातील संकेश्वर रोड, आजरा रोड, भडगाव रोड, बस स्थानक परिसर या ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतुकीला धोका निर्माण होत आहे. या संदर्भात शिवसेनेचे उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी, संदीप कुराडे यांनी शहरातील खड्डयांची दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.

दरम्यान, मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देत शहरातील रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे मुजवण्याचे काम हाती घेण्याची सूचना दिली. सध्या रस्ता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे शहरवासीयातून समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.