Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात डॉ.आप्पासाहेब पवार यांना अभिवादन


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील शिवराज महाविद्यालयात बी.सी.ए, विभागाच्यावतीने शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

प्रारंभी डॉ.विद्या देशमुख यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.स्वागत व प्रास्ताविक प्रा.बी.एस, पठाण यांनी केले. यावेळी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन करताना म्हणाले, कुलगुरू डॉ.आप्पासाहेब पवार यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना खऱ्याअर्थी घडविण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी बहुजन समाजाच्या विद्यार्थी हित जपण्यासाठी अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यासाठी शिवाजी विद्यापीठामध्ये कमवा व शिका, हि योजना सुरु करून अनेक विद्यार्थ्याच्या करिअरला बळ देण्याची मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्यामुळे आज बहुजन समाजातील बहुसंख्य विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. अशा या महान शिक्षणशार्दुल व्यक्तिमत्वाने समाजातील बहुजनांच्या शिक्षणासाठी महान आपले कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन डॉ.अनिल कुराडे यांनी केले. यावेळी महान फुटबॉलपटू पेले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, बी.सी.ए.विभाग प्रमुख प्रा.के.एस.देसाई, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.सुधीर मुंज, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, डॉ.आनंदा कुंभार, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार प्रा.यु.एस.पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.