Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात दि. २ जानेवारीला जाहीर व्याख्यान, कर्मवीर पुरस्कार वितरण समारंभ


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील शिवराज महाविद्यालयाच्या प्रांगणात दि. २ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक व विचावंत प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे 'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सर्वजनवादी कार्य' या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे.

यावेळी 'कर्मवीर गुणवंत शिक्षक व कर्मवीर प्रशासकीय कर्मचारी पुरस्कार' वितरण तसेच कर्मवीरांचे विचार कृतीत आणण्याचा प्रयत्न करणारे या भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि जटामुक्त भगिनी यांचा सत्कार असा संयुक्त समारंभ आयोजीत करण्यात आला आहे.

 या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे हे भूषविणार आहेत. कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.जे.वाय.बारदेस्कर, के.जी.पाटील, ॲड. दिग्विजय कुराडे, सचिव डॉ.अनिल कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी केले आहे. कार्यक्रमाचे आयोजन समन्वयक प्रा. विश्वजित कुराडे व कार्यक्रम समिती करीत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.