Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चंदगड- ठाणे आरामदायी बससेवा सुरू

चंदगडसह  गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील नागरिकांची होती मागणी 


चंदगड (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चंदगड ते ठाणे आरामदायी बससेवेला मंगळवार पासून प्रारंभ झाला. गेल्या कित्येक दिवसांपासूनची समस्त चंदगड - गडहिंग्लज - आजरा तालुक्यातील नागरिकांची मागणी होती.

 एसटीचा मार्ग व वेळापत्रक येथे पहा 👇

या बससेवेचा शुभारंभ चंदगड आगार येथून करण्यात आला.  चंदगड-गडहिंग्लज-आजरा तालुक्यातील नागरिकांनसाठी हा सुवर्णक्षण आहे, याचा साक्षीदार मला होता आले हे मी माझे भाग्य समजतो असे उदगार भाजप राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील यांनी काढले.

यावेळी भाजप तालुका अध्यक्ष नामदेव पाटील, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, माजी सभापती शांताराम पाटील, अनिल शिवणगेकर, भाजप युवा मोर्चा सरचिटणीस लक्ष्मण यादव ,बाबुराव हळदणकर तसेच एस.टी. कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.