Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागावच्या 'संत गजानन' आयुर्वेदिक महाविद्यालयाला सुवर्णपदक

जागतिक आयुर्वेद परिषदेत शोधनिबंधाचा झाला गौरव


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
 पणजी (गोवा) येथे झालेल्या नवव्या जागतिक आयुर्वेद परिषदेत आयोजित संशोधन विभागासाठीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक पुरस्कार महागाव (ता. गडहिंग्लज ) येथील संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयाला मिळाला. या महाविद्यालयाचा विद्यार्थी ऋषभ बोरकर यांनी सादर केलेले संशोधन शोधनिबंधाच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी परिषदेसाठी आलेल्या जागतिक संशोधक व तज्ञानी या कल्पकतेला उत्कृष्ट शेरा देत कौतुक केले.

 'एका आरोग्यासाठी आयुर्वेद' च्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या परिषदेचे जागतिक आयुर्वेद फाउंडेशन तर्फे केंद्रीय आयुष मंत्रालय, गोवा सरकार आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेद उत्पादने आणि सेवांचा प्रचाराला आणखी चालना मिळावी या हेतूने या परिषदेचे आयोजन केला होता. यामध्ये संशोधन विभागातील प्रोजेक्टसाठी वृषभ बोरकर या विद्यार्थ्यांनी 'डायटिक्स फूड टेक्नॉलॉजी' या विषयांतर्गत नाचणी पासून आयुर्वेदिक चहा, कुकीज, नूडल्स, उत्साहवर्धक पेय, चॉकलेट या उपपदार्थाचे शोधनिबंध सादरीकरण केले होते यासाठी  परिषदेत आलेले तज्ञ व मान्यवराकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या प्रयोगासाठी वेगवेगळ्या परीक्षणातून प्रथम क्रमांकाचे सुवर्ण पदक प्राप्त झाले. याबद्दल या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासाठी प्राचार्या  डॉ. मंगल मोरबाळे व सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. दरम्यान, संस्थाध्यक्ष ॲड.आण्णासाहेब चव्हाण यांनी विशेष कौतुक करत संशोधन प्रोत्साहनसाठी रोख बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचा गौरव केला.

यावेळी चव्हाण यांनी शिक्षण समूहातील संशोधनाला अधिक चालना मिळावी यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा व स्वतंत्र विभागाची आखणी येत्या वर्षभरात करीत आहोत यासाठी पुणे येथील भारती व बेळगावच्या के.एल.ई. या विद्यापीठातील तज्ञ व संशोधकांकडून मार्गदर्शन व माहिती घेत असल्याचे सांगितले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.