गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील राजा शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी गडहिंग्लज येथील इंडिया इन्फो लाईन प्रा. लि. या संस्थेस भेट दिली.
यावेळी शाखा व्यवस्थापक सुनील गणाचार्य यांनी संस्थेच्या मार्फत गोल्ड लोन, व्यावसायिक कर्ज,गृह कर्ज, विमा संरक्षण याबद्दल माहिती देत संस्थेच्या भारतातील विविध शहरात ३११९ शाखा असल्याचे सांगितले.
या अभ्यास सहलीचे आयोजन वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. किशोर पाटील व प्रा.अनिश पोटे यांनी केले. यावेळी शाखेतील सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती दिली. यावेळी सर्वांचे आभार प्रा.वैशाली पाटील यांनी मानले. या अभ्यास सहलीस प्राचार्य डॉ. निवास जाधव यांचे मार्गदर्शन,संस्था अध्यक्ष बाळासाहेब कुपेकर यांचे प्रेरणा व संस्था सचिव बी. ए.पाटील यांचे सहकार्य लाभले.

