Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला महाराष्ट्र प्रशासकीय सेवा महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील महाराष्ट्र प्रशासकीय महाविद्यालयात प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे व सहाय्यक जिल्हाधिकारी सुहास गाडे यांनी एमपीएससी  व  यूपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन केले.

प्रारंभी मान्यवरांचे स्वागत संस्था अध्यक्ष एम.जी.पाटील व  महाविद्यालयाच्या प्राचार्या गंगाली पाटील यांनी पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन केले. यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन केले व प्रशासकीय सेवेचा अनुभव सांगितला.

सहाय्यक जिल्हाधिकारी सुहास गाडे यांनी युपीएससी व एमपीएससी बाबत मार्गदर्शन करताना परीक्षांची आजची स्थिती, परीक्षेचे बदलते स्वरूप, वैकल्पिक विषय निवडताना विचारात घ्यावयाच्या बाबी, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीला कसे सामोरे जावे याबाबत आपला अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच  प्रश्न-उत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.

यावेळी सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किर्तीदेवी सावंत यांनी केले. आभार संस्था सेक्रेटरी आर.जी. पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.