![]() |
| गडहिंग्लज : लेफ्टनंट प्रणव खोराटे यांचा सत्कार करताना आजी- माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी) प्रणव जयवंत खोराटे यांची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर निवड झाली आहे. याबद्दल त्यांचा विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला. मूळचे खोराटवाडी येथील व सध्या गडहिंग्लज येथे राहणारे निवृत्त सुभेदार जयवंत खोराटे यांचे प्रणव हे चिरंजीव आहेत.
![]() |
| गडहिंग्लज : लेफ्टनंट प्रणव खोराटे यांचा सत्कार करताना उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे. यावेळी माजी सैनिक कुमार पाटील यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी. |
1971 च्या भारत-पाक युद्धातील प्रत्यक्ष सहभागी शंकर नेसरगी व त्यांच्या पत्नी सौ.पार्वती नेसरगी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन प्रणव यांचा सत्कार करण्यात आला.
![]() |
| गडहिंग्लज : लेफ्टनंट प्रणव खोराटे यांच्या सत्कारप्रसंगी शंकर नेसरगी, सौ.पार्वती नेसरगी यांच्यासह आजी- माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी. |
यावेळी जय जवान जय किसान फौंडेशन गडहिंग्लज, आजी-माजी सैनिक संघटनेचे करंबळी, हरळी खुर्द, नेसरी, हसूरचंपू, जरळी, अत्याळ, बेळगुंदी, इंचनाळ येथील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांच्याकडूनही प्रणव यांचा सत्कार करण्यात आला.
![]() |
| गडहिंग्लज : लेफ्टनंट प्रणव खोराटे यांचा सत्कार करताना आजी- माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी. |
प्रांत कार्यालयातही सत्कार
त्यानंतर उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रांत कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी सुहास गाडे यांची उपस्थिती होती.
![]() |
| गडहिंग्लज : उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे व आजी-माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत लेफ्टनंट प्रणव खोराटे. |
यावेळी सुबराव पाटील, सुभाष इंगळे, प्रवीण माळी, संजय जाधव, दत्ता जाधव,शशिकांत चौगुले, बाळू पोवार, शिवाजी काकडे, हिंदुराव पाटील,भैरवनाथ देसाई, महादेव घुगरे, गुंडू सुतार यांच्यासह जिल्हा संघटक कुमार पाटील, शशिकांत जाधव, सैनिक फेडरेशनचे तालुका अध्यक्ष रवींद्र मंडलिक उपस्थित होते.
बातमीचा व्हिडिओ पहा 👇





