Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वडरगे रोडची तातडीने दुरुस्ती करा

बीएसएनएल कार्यालय ते जुने मच्छी मार्केट दरम्यान खड्डे पडल्याने वाहतुकीला धोका 

नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील वडरगे रोडवर काही ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूक धोक्याची बनली असून तातडीने या मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी संतोष मांगले यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, वडरगे रोडवरील बीएसएनएल कार्यालय ते जुने मच्छी मार्केट या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. याच मार्गावर पोस्ट ऑफिस देखील असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह इतरांचे सतत येणे जाणे असते. या रस्त्यावरून वाहनेही सुसाट येत असतात. त्यातच आठवडी बाजारादिवशी या मार्गावर रहदारी जास्त असते. रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रहदारीचे प्रमाण पाहता सिटी बाजार नजीक गतिरोधक बसवणे गरजेचे आहे. तातडीने खड्डे मुजवून रस्ता दुरुस्त करण्यात यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनावर संतोष मांगले, राजू मोहिते, विनायक देवार्डे, प्रेम इंगळे, विशाल बारामती, मज्जीद किल्लेदार, पवन बुगडे, दिनेश किल्लेदार, दीपक जोंधळे, निरंजन पाटील, ओंकार बेळगुंदकर, उमेश मुसळे आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.