Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमध्ये वन विभागाच्या पथकाचा घरावर छापा


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
गडहिंग्लज येथे एका घरावर वनखात्याच्या विशेष पथकाने अचानक छापा टाकून तब्बल दोन तास शोधाशोध केली. या छाप्यात या पथकाने या घरातून छऱ्याची एक बंदूक व छरे ताब्यात घेतली आहेत. वन विभागाच्या पथकाने टाकलेल्या या छाप्याची जोरदार चर्चा शहरात दिवसभर सुरू होती.

याबाबतची अधिक माहिती अशी की, शहरातील कडगाव रोडवरील एका घरात वन्य प्राण्यांचे अवशेष असल्याची खबर वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर वन खात्याच्या विशेष पथकाने कडगाव रोडवरील एम.आर. हायस्कूल जवळ एका घरासमोर सापळा रचत दुपारी बाराच्या दरम्यान त्या घरावर छापा टाकला. या पथकाने तब्बल दोन तास घर व परिसराची शोधाशोध केली. या ठिकाणी वन्य प्राण्यांचे कोणतेही अवशेष सापडले नाहीत. अखेर या घरात छऱ्याची एक बंदूक या पथकाच्या हाती लागली. हे बंदूक व छरे पथकाने ताब्यात घेतली आहेत. मात्र दुपारी वर्दळीच्या ठिकाणी वन खात्याने टाकलेल्या छाप्याची जोरदार चर्चा गडहिंग्लज शहरात सुरु होती.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.