गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव( तालुका गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय झालेल्या विविध स्पर्धेत यश मिळवले.
यामध्ये पुणे येथे झालेल्या स्पर्धेत सर्वज्ञ सावंत यांनी धावणे मध्ये विजेता तर लोणी (अहमदनगर) येथे झालेल्या स्पर्धेत भक्ती पोटे हिने धावणे मध्ये उपविजेत्या ठरल्या. तसेच जिल्हास्तरीय व विभागीय स्तरावर झालेल्या स्पर्धेत पाल येथे झालेल्या कबड्डीत व संजय घोडावत शिरोळ येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेत मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकावित यश संपादन केले. गारगोटी येथील स्पर्धेत सर्वज्ञ सावंत धावणेमध्ये उपविजेता, सुमित बाळेकुंद्री धावणे उपविजेता, शिरोळ येथील स्पर्धेत प्रज्वल नाईकवाडे यांनी वेटलिफ्टर मध्ये उपविजेता ठरला. तर सांगली येथे झालेल्या स्पर्धेत भक्ती पोटे हिने धावणे मध्ये विजेते ठरल्या.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य प्रा. डी. बी. केस्ती, प्रा. आर.एस.पाटील, प्रा. व्ही.आर. कोरी व शिक्षकांचे मार्गदर्शन तर संस्थाध्यक्ष ॲड.आण्णासाहेब चव्हाण यांनी अभिनंदन केले.

