Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उंबरवाडीतील मॅरेथॉन स्पर्धेत सुशांत जेधे, प्राजक्ता शिंदे प्रथम


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
महागाव -उंबरवाडी येथील शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त महागाव उंबरवाडी येथील आजी-माजी सैनिक संघटना व नेताजी कला व क्रीडा मंडळ यांच्या वतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत खुल्या गटात मुलांमध्ये सुशांत जेधे(नेसरी), मुलींमध्ये प्राजक्ता शिंदे (नेसरी) यांनी प्रथम क्रमांक पटकावले. 

या स्पर्धेचे उदघाटन वीरपिता गणपती चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धा उंबरवाडी - हरूर या मार्गावर घेण्यात आल्या. खुल्या गटासाठी मुले दहा तर मुलींसाठी सहा किलोमीटर अंतर ठेवण्यात आले होते.

खुल्या गटात मुलांमध्ये प्रथम क्रमांक सुशांत जेधे (नेसरी), द्वितीय क्रमांक प्रधान किरोलकर ( कोल्हापूर), तृतीय क्रमांक भैरू नाईक  ( आलाद ) चतुर्थ क्रमाक  विघ्नेश नाईक (नेसरी) यांनी तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक प्राजक्ता शिंदे (नेसरी), द्वितीय क्रमांक सृष्टी रेडेकर ( नेसरी), तृतीय क्रमांक शहाजादाबी किल्लेदार (गडहिंग्लज),चतुर्थ क्रमांक शुक्राणी पसारे (मडिलगे) हिने पटकावला.

सर्व विजेत्या स्पर्धकांना   वीरपिता गणपती चौगुले , महागाव - उंबरवाडी येथील आजी - माजी सैनिक संघटना आणि नेताजी कला व क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी सचिन सावंत यांनी शहीद जोतिबा चौगुले यांच्या आठवणींना उजाळा दिला व सर्वांनी आदरांजली वाहिली. सूत्रसंचालन रामदास ढगे यांनी केले. या स्पर्धेसाठी महागाव- उंबरवाडी येथील क्रीडाप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.