गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील समीर सुनिल सुरंगे यांची भारतीय नौदलात (इंडीयन नेव्ही) सिनीयर सेकंडरी रिक्रुट (SSR)पदी निवड झाली आहे.
समीर यांना डीएसए काॅलेज भंडारा, झेप अकॅडमी गडहिंग्लज व संघर्ष अकॅडमी गुडाळ (ता राधानगरी) यांचे मार्गदर्शन लाभले आहे. समीर यांच्या या यशाबद्दल कौतुक होत असून विविध संस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

