गडहिंग्लज(प्रतिनिधी): येथील महाराष्ट्र प्रशासकीय सेवा महाविद्यालयात ग्राहक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनेते अमोल देसाई तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायत गडहिंग्लजचे माजी तालुकाअध्यक्ष राजेंद्र आंबी, संस्थेचे संचालक एल.जी.पाटील, संचालिका विशाखा पाटील उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या गंगाली पाटील यांनी सन्मानचिन्ह व बुके देऊन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भित्तिपत्रकाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी राजेंद्र आंबी यांनी ग्राहकांनी कसे जागरूक असणे गरजेचे आहे याचे महत्त्व सांगितले. तसेच ग्राहक हा राजा आहे हे उदाहरणासह पटवून दिले.
अर्थशास्त्र विभागाच्या प्रा.सुषमा पाटील यांनी उत्तम दर्जा आणि योग्य किंमत यासाठी ग्राहकांनी आग्रही राहिले पाहिजे असे आवाहन केले. तसेच ग्राहकांचे सध्याचे नवीन हक्क व कायदे याविषयी सखोल माहिती दिली.अभिनेते अमोल देसाई यांनी ग्राहक दिन विषयी आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. प्रा.रणदिवे यांनी आपल्या रोजच्या व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या वॉरंटी आणि गॅरंटी या शब्दांमधील फरक समजावून सांगितले व सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


