गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सोनाली विभुते व आदित्य शिंदे या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये राष्ट्रीय एकात्मता हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला दिलेले महत्त्वाचे मूल्य आहे. त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने संविधानाच्या माध्यमातून मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे आजही संपूर्ण भारत देश एकसंघ असल्याचे सांगितले.
यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉ. मनमोहन राजे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एन.आर. कोल्हापुरे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्रा. सौ.बिनादेवी कुराडे, जनसंपर्क अधिकारी प्रा.विक्रम शिंदे यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.


