Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागावच्या राजा शिवछत्रपती महाविद्यालयात 'पर्यावरण : प्रदूषण आणि संरक्षण ' विषयावर कार्यशाळा


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
महागाव येथील राजा शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत  'पर्यावरण : प्रदूषण आणि संरक्षण 'या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.

कार्यशाळेचे उदघाटन प्राचार्य डॉ. निवास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी प्लास्टिक, बॉटल्स, घनकचरा करू नका. शाश्वत, पारंपरिक जीवनशैली जगण्याचे आवाहन केले. यावेळी संस्था सचिव बी. ए. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात शिवराज महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. किशोर अदाटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पर्यावरण प्रदूषण हा व्यापक विषय आहे. पाण्यापासून होणारे वेगवेगळे आजार व प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात चंदगड येथील र .भा. माडखोलकर महाविद्यालयाचे डॉ. के. एन. निकम हे प्रमुख मार्गदर्शक होते. त्यांनी आपला परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. स्थानिक पातळीवर पर्यावरणाची सर्वांनी जपणूक केली पाहिजे असे आवाहन केले.

प्रास्ताविक प्रा.डी.जी. कापुरे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय डॉ.संदीप इंगळे व प्रा. वनिता विरकर यांनी करून दिला.  सूत्रसंचालन डॉ. सुगंधा घरपणकर यांनी केले. प्रा.वैजनाथ सूर्यवंशी यांनी आभार मानले. या कार्यशाळेसाठी आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील प्राध्यापकांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेस संस्था अध्यक्ष बाळासाहेब कुपेकर यांची प्रेरणा लाभली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.