गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या सारथी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत मोठ्या गटात महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थ्यांनी अथर्वी दिवटे हिने प्रथम क्रमांक व विपुल चव्हाण याने तृतीय क्रमांक मिळविला.
त्यांच्या या यशाबद्दल समर्थ महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन शंकरराव पाटील, प्राचार्य आय.एस.पाटील, संस्था प्रतिनिधी डी. एस. पाटील, आण्णासाहेब पाटील, यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

