Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागावच्या म. फुले विद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत यश


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
महागाव येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे शालेय क्रीडा स्पर्धेत यश संपादन केले. १७ वर्षाखालील गटात साक्षी पाटील लांब उडी प्रथम, पृथ्वीराज कांबळे १५०० व ३००० मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय,आशुतोष घबाडे यांनी थाळीफेक द्वितीय व भालाफेक स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवले. या स्पर्धकांची वारणानगर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यशस्वी स्पर्धकांचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक एस.पी. कोकितकर यांचे समर्थ महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन शंकरराव पाटील,प्राचार्य आय. एस.पाटील, संस्था प्रतिनिधी डी. एस. पाटील, आण्णासाहेब पाटील यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.